आज दिवसभरात रुग्णसंख्येत 159 ने वाढ
तर 137 जणांना डिस्चार्ज
। अहमदनगर । दि.23 फेब्रुवारी । जिल्ह्यात आज 137 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 72 हजार 769 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.29 टक्के इतके झाले आहे.
काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 159 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 899 इतकी झाली आहे.
दरम्यान, आज जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 63, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 81 आणि अँटीजेन चाचणीत 15 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 26, अकोले 01, कर्जत 02, कोपरगाव 03, नगर ग्रामीण 10, राहाता 02, राहुरी 01, संगमनेर 13, शेवगाव 04 आणि इतर जिल्ह 01अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28, अकोले 01, जामखेड 02, कर्जत 01, कोपरगाव 04, नगर ग्रामीण 08, नेवासा 01, पारनेर 05, राहाता 05, संगमनेर 21, श्रीगोंदा 02, श्रीरामपूर 01आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 15 जण बाधित आढळुन आले. मनपा 06, नगर ग्रामीण 03, पारनेर 02, पाथर्ढी 01, श्रीगोंदा 02 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये, मनपा 18, अकोले 06, जामखेड 05, कर्जत 06, कोपरगाव 12, नगर ग्रामीण 13, नेवासा 02, पारनेर 12, पाथर्डी 08, राहाता 09, राहुरी 04, संगमनेर 13, शेवगाव 10, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 04 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:72769
*उपचार सुरू असलेले रूग्ण: 899
*मृत्यू:1129
*एकूण रूग्ण संख्या:74797
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा
खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
माझे कुटुंब माझी जबाबदारी