। अहमदनगर । दि.24 फेब्रुवारी । टिप्परमध्ये झोपलेल्या टिप्पर मालकास पाच ते सहा जणांनी मारहाण करुन त्यांच्याकडील 27 लाख 10 हजार किंमतीचा टिप्पर पळवुन नेला ही घटना मंगळवारी (दि.23) रोजी सकाळी 5.45 वा.घडली.
याबाबतची माहिती अशी की, हरिप्रसाद अशोक देशमुख (वय 28, रा.केज, बिड) हे त्यांचा टिप्पर (क्र.एम.एच.44 - 9074) हा कोपरगाव तालुक्यातील बहादुरपुर येथील किरण अप्पासाहेब रहाणे यांच्या शेतात लावुन टिप्परच्या कॅबीनमध्ये झोपले असताना त्यांच्या टिप्परचा ड्रायव्हर समाधान राठोड आण 4 ते 5 अनोळखी इसम यांनी केबीनमध्ये घुसून हरिप्रसाद या लामारहाण केली.
त्यांच्या खिशातील पैशाचे पाकीट हिसकावून घेतले. तसेच मोबाईल घेवून लांब भिरकावला आणि टिप्पर घेवून पळून गेले. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी हरिप्रसादर देशमुख यांच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 395 प्रमाणे दरोड्याच्या गुन्हयाची नोेंद केली. अधिक तपास पोलिस निरिक्षक लोखंडे हे करीत आहे.