भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा

 भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मैद यांच्याकडून आढावा

आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांना प्रोत्साहन : योगेश मैद


। अहमदनगर ।  दि.11 फेब्रुवारी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी विविध लाभाच्या योजना राबवित आहेत. या योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचवून त्याचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. आत्मनिर्भर योजनेंतर्गत युवकांसाठीही अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.


युवकांसाठी  स्वनिधी योजनांतर्गत 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन त्यांना स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. ही योजना युवकांपर्यंत पोहचविण्याचे त्यांना आत्मनिर्भर करण्याचे युवा मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावे. 


त्याचबरोबर पक्षाची ध्येय-धोरणे युवकांना समजून सांगून पक्षाशी त्यांना जोडावे. यासाठी राज्यभर अभियान राबविण्यात येत आहे. नगरमध्ये भाजप युवा मोर्चाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविण्यासाठी योगदान द्यावे. पक्ष त्यांच्या कार्याची दखल घेऊन योग्य संधी देईल, असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद यांनी केले.

 

भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश मैद नगरमध्ये आले असता त्यांचा सत्कार  युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष महेश तवले यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सत्यजित कदम, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक अंकित संचेती, युवा मोर्चा सरचिटणीस आशिष आनेचा, मल्हार गंधे आदि उपस्थित होते.

 

याप्रसंगी  महेश  तवले  यांनी  भाजप युवा मोर्चाचे नगरमध्ये सक्रिय काम असून, युवकांना पक्षामध्ये सामावून घेण्यात येत आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्ते पक्षाची कार्यक्रम सर्वसामान्यापर्यंत पोहचवून केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वरिष्ठ पदाधिकारी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ताकद देत असून, भविष्यात युवा मोर्चाचे कार्यकर्ते पक्षात मोठे योगदान देतील असे सांगून शहरातील युवा मोर्चाचा आढावा सादर केला. 

 

 याप्रसंगी अंकित संचेती यांनी आत्मनिर्भर योजनांची माहिती देऊन पदाधिकार्‍यांनी प्रत्येक मंडलामध्ये युवकांना पक्षाची जोडण्याचे काम करावे, असे आवाहन केले. यावेळी सत्यजित कदम यांनीही जिल्ह्यातील युवा मोर्चाच्या कार्याची माहिती दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद निंबाळकर यांनी केले तर आभार आशिष आनेचा यांनी मानले. याप्रसंगी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राजेंद्र सातपुते, उमेश भालसिंग, उदय शिंदे, किरण जाधव, राकेश भाकरे, विकास झिंजुर्डे, भिंगार युवा मोर्चा अध्यक्ष महेश कटोरे, आकाश सोनवणे, अ‍ॅड.आशिष पोटे, आनंद निंबाळकर, सिद्धार्थ ठाकूर, यश शर्मा, अजित कोतकर, अंकुश भापकर, रमेश भराडिया, कार्तिक तगारे, वैभव झोटिंग, सिद्धेश नाकाडे, हुजेफा शेख, साहिल शेख आदि उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post