खुनाचा प्रयत्न करणार्‍या फरार आरोपीस अटक

पोलिस उपअधिक्षक संदीप मिटकेच्या पथकाची कारवाई


। अहमदनगर । दि.27 फेब्रुवारी ।  लोखंडी गजाने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणार्‍या अडिच वर्षापासून फरार असलेल्या सद्दाम उर्फ बबलु राजु शेख (रा.रामगड,ता.श्रीरामपुर) या आरोपीस पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.26) रोजी शिताफीने अटक केली.


याबाबतची अधिक माहिती अशी की, दि.23 सप्टेबंर 2018 रोजी नासिर सलिम शेख (रा.आठवाडी,एकलहरे,ता.श्रीरामपुर) यास त्याच्या घरी जाऊन सद्दाम उर्फ बबलु शेख याने लोखंडी गजाने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केला.


याप्रकरणी श्रीरामपुर शहर पोलिसांनी नासिर शेख याच्या फिर्यादीवरुन भादवि कलम 307 प्रमाणे खुन्याच्या प्रयत्नाच्या गुन्हयाची नोंद केली आहे. घटना घडल्यानंतर बबलु शेख हा पसार झाला होता.


पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांना मिळालेल्या माहितीवरुन त्यांच्या पथकाने बबलु शेख यास शिताफीने अटक केली. ही कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 


पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरिक्षक संजय सानप, पोलिस उपनिरिक्षक सुरवडे, पोलिस हवालदार जोसेफ साळवे, पो.ना.दुधाडे, पोका दिघे, पंकज गोसावी, राहुल नरोडे, संतोष बडे, महेश पवार, किशोर जाधव यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post