वाळुची चोरटी वाहतुक करणारा टेम्पो पकडला

। अहमदनगर । दि.08 फेब्रुवारी ।  विना परवाना बेकायदेशीर रित्या शासकिय वाळूची चोरटी वाहतुक करणारा टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडला. हि कारवाई देहरे टोल नाक्याजवळ देहरे येथे शनिवारी (दि.6) केली.


देहरे टोलनाक्या जवळुन 1 ब्रस वाळू घेऊन जाणारा टेम्पो (क्र.एम.एच.16 सी.सी.4373) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. चालकाकडे कागदपत्राची चौकशी केली असता, त्याच्याकडे कागदपत्रे नसल्याचे निदर्शनात आले. यावरुन पोलिसांनी एक ब्रास वाळूसह टेम्पो असा सुमारे 3 लाख 10 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.


चालक अनिल गंगाराम वाघमारे (रा.नांदगाव) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भादवि कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्हयाची नोंद केली असुन अधिक तपास पोलिस नाईक शिंदे हे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post