देहरेजवळ टेम्पोच्या धडकेत एक ठार

। अहमदनगर । दि.07 फेब्रुवारी ।  देहरे येथुन राहुरीकडे वेगात जाणार्‍या आयशर टेम्पोने जोरात धडक दिली. या धडकेत 34 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला हि घटना नगर - मनमाड रोडवरील देहरे गावच्या शिवरात हॉटेल समर्थ जवळ गुरुवारी (दि.4) रोजी दुपारी घडली.


देहरेकडुन राहुरीकडे जाणार्‍या टेम्पो ने (क्र.जी जे 03, बी.टी.8154) धडक दिल्याने सुनील जगन्नाथ नवले (वय 34, रा.देहरे) यांचा मृत्यू झाला. तर शुभम पांडे हा गंभीर जखमी झाला.


या प्रकरणी अनिल नवले यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी भादवि कलम 304 (अ), 279, 337, 338,34, मोटार वाहन कायदा कलम 184, 134 (अ) (ब) 177 प्रमाणे अपघाताच्या गुन्हयाची नोंद केली असून अधिक तपास पो ना. अरुण गांगर्डे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post