। अहमदनगर । दि.10 जानेवारी । कराराचा भंग करुन अनाधिकाराने भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वाहन प्रवेश कराची वसुली करुन, दहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत विकी चंदलाला लालवाणी (रा.हेमू कॉलनी, गार्डन जवळ, पिंपरी- पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भिंगार पोलिस ठाण्यात कॅन्टोमेंटचे वरिष्ठ राजस्व लिपीक शिशिर बाळकृष्ण पाटसकर (रा. कृष्ण गोपाळ हाऊसिंग सोसायटी, नगर पाथर्डी रोड, भिंगार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विकी चंद्रालाल ललवाणी (रा.हेमू कॉलनी, गार्डन जवळ, पिंपरी- पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, ही घटना 11 सप्टेंबर 2015 ते दिनांक 30 जुन 2016 या कालावधील घडली आहे. यामध्ये एकूण 10 कोटी 20 लाख 25 हजार 510/- रुपये फसवणुकीचे इराद्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या न भरता तसेच मेसर्स ओमकार कन्स्ट्रक्शनचे मालक प्रोप्रायटर पिलोक सिंग खडक सिंग रावल हे दिनांक 11 सप्टेंबर 2015 रोजी मयत झालेली असतानाही
आरोपी याने सदर बाबत कॅन्टोनमेंट बोर्ड माहिती न देता सदरचे मुखत्यारपत्र हे संपुष्टात आल्यानंतर ही त्या मुखत्यार पत्राचा वापर करून ते अस्तित्वात आहे, असे भासवून आरोपी मजकूर याने दिनांक 11 सप्टेंबर 2015 ते दि.30 जुन 2016 पर्यंत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे वाहन प्रवेश कराचे अनाअधिकाराने वसुली करून करार भंग करून अपहार केला आहे. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
