कढीपत्ता चटणी

काही पदार्थ असे आहेत जे कढीपत्या शिवाय अपूर्णच असतात. पोहे, वरण फोडणी साठी तर हमखास वापरला जातो कढीपत्ता. शिवाय आरोग्यासाठी देखील चांगलेच असते. पण बऱ्याच  जणांना कढीपत्ता आवडत नाही. मघ पुढील प्रकारे चटणी करून बघा नक्की आवडेल.

 

साहित्य :-  

    १ टेस्पून तेल
    १ कप कढीपत्ता पाने
    १/४ कप सुकं खोबरं (किसलेले आणि भाजलेले)
    २ टीस्पून लाल तिखट
    १ टीस्पून गूळ किंवा साखर
    चवीपुरते मीठ

कृती :- तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने परतावीत. आच मंद ठेवावी. कढीपत्ता कुरकुरीत होईस्तोवर परतावे. आता भाजलेले खोबरे घालून थोडावेळ मंद आचेवर परतावे. आच बंद करावी. मिश्रण थंड होवू द्यावे. त्यात लाल तिखट, गूळ/साखर आणि थोडे मीठ घालून मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे. तुम्ही चटणीत १ टीस्पून भाजलेले तीळ, १/४ चमचा जिरे घातले तरी चालेल. थोडी आंबट चव हवी असल्यास थोडी आमचूर पावडर घालावी. कढीपत्ता चटणी तयार.

 


 

Post a Comment

Previous Post Next Post