। मुंबई । जानेवारी । गेल्या काही दिवसांपासून अभिनेता मिलिंद सोमण एका खास लूकमुळे चर्चेत होता. हा त्याचा लूक नेमका कशासाठी आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
मिलिंद सोमण लवकरच ‘पौरषपुर’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या शोमध्ये तो एक वेगळ्या प्रकारची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘पौरषपुर’ ही वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली असून या वेब सिरीज सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. या वेब सिरीजमध्ये सर्व पात्र 16 व्या शतकातील एका राज्याची ही कथा सांगितली असून यातील एक बोल्ड इंटिमेट सीन्स सोशलवर चर्चेत आले आहे
या बोल्ड सीनमध्ये अभिनेत्री अश्मिता बख्शी अन्नू कपूरसोबत लव्ह मेकिंग सीनमध्ये पाठीवर वितळते मेण टाकले जाते. या सिनमुळे तिचे सध्या सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही मिलिंद सोमण यांचा चेहऱ्यावर रंग, डोळ्यात काजळ आणि नोजपिन असा लूक सोशल मीडियावर चर्चेत आला होता.
Tags:
Entertainment
