शहर वाहतुक नियंत्रण शाखेची धडक कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या 

785 जणांवर कारवाई

। अहमदनगर । दि. 24 जानेवारी ।  शहरातील वाहतुकीचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने 32 व्या रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत वाहतुक नियमांचा भंग करणार्‍यांवर पोलिस निरिक्षक विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलिसांनी शहरात जवळपास 785 जणांवर ठपका ठेवत दंड वसुल केला आहे.


32 व्या रास्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतुक नियमांचा भंग करणारे वाहनचालक यांचेविरुध्द विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून, या कारवाईमध्ये ट्रिपलसिट, विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, नो इंन्ट्री नंबरप्लेट, मादक द्रव्याचे सेवन करुन वाहन चालवणे, भरधाव वेगाने वाहन चालवणे इत्यादी प्रकरणाच्या विविध वाहतुक नियमभंग करणारे वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात आली.


यामध्य दि.22 जानेवारी रोजी 358 वाहनचालकांविरुध्द कारवाई करुन 93 हजार 300 रुपये तर दि.23 जानेवारी रोजी पत्रकार, चौक मार्केटयार्ड चौक आदी ठिकाणी 427 जणांवर कारवाई करुन दंड वसुल करण्यात आला आहे.


यासह पुढील काळातही रस्ता सुरक्षा अभियांनातर्गत महिलांविरुध्द होणारे अपराध (उदा. चैन स्नूचिंग) रोखण्याच्या दृष्टीने विनानंबर प्लेट, भरधाव वेगाने वाहन चालविणे, जादा क्षमतेची दुचाकी वाहने, ट्रिपल सिट, धोकादायकरित्या वाहन चालवणे आदी प्रकारचे वाहतुक नियमांचा भंग करणारे वाहनचालकांविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे.


तसेच विरुध्द दिशेने वाहन चालवल्याने अपघत होत आहेत. तसेच वारंवार वाहतुक कोंडीचे देखील प्रकार घडत आहेत याला आळा घालण्यासाठी विरुध्द दिशेने वाहन चालकांवर देखील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 


वाहनचालकांनी वाहन चालवितांना वाहतुक नियमांचे पालन करुन अपघातांचे प्रमाण कमी करणे करीता आपले शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत राहुन कायदा व सुव्यवस्था आबाधित राखणेसाठी  पोलिसा  प्रशासनाला ससहकार्य करावे असे आवाहन शहर वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलिस निरिक्षक विकास देवरे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post