दरोड्याच्या तयारीतील तीन जण ताब्यात

। अहमदनगर । दि. 24 जानेवारी । गुहा येथे पाटाजवळ शनिवारी पहाटेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करुन तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. अंधाराचा फायदा घेऊन दोघे पसार झाले.


अभिषेक गोरख मोरे (वय 20, रा.तनपुरेवाडी रस्ता, राहुरी), पप्पू उर्फ अतुल बबन गायकवाड (वय 21, रा.लोहीर गल्ली, राहुरी), विशाल सुनील जगधने (वय 20, रा.लक्ष्मीनगर, राहुरी) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत.


गायकवाड यांच्यावर लोणी व राहता पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांची झाडाझडती घेतली असता एक सुरा, मिरचीपूड, नायलॉन दोरी, लाकडी दांडके असे दरोड्याचे साहित्य व काळ्या रंगाची दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


पोलिस उपनिरिक्षक मधुर शिंदे राहुरी येथे गस्तीपथकात होते. पोलिस दिसताच या टोळीने पळ काढण्याचा प्रयत्न केला होता मात्र तो असफल झाला.

Post a Comment

Previous Post Next Post