जीप-टेम्पोच्या धडकेत लोणीचे सहा जखमी

। अहमदनगर । दि. 24 जानेवारी । नाशिक-पुणे महामार्गावर चालकाचा जीपवरील ताबा सुटल्याने टेम्पोला धडक देत जीप महामार्गाच्या दुभाजकाला धडकली. यात जीपमधील लोणीचे 6 जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजता नाशिक-पुणे महामार्गावर आंबीखालसा फाट्यावर घडली.

जीप (एमएच 16 एजी 6892) पुण्याला चालकाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने ती टॅम्पो (एमएच 12 एनएक्स 1258) मागून धडकून जीप दुभाजकावर गेली. यात चालक अभिजित चंद्रसेन आहेर, मयूर विजय बागूल, तेजस कैलास आहेर, एकनाथ भाऊसाहेब आहेर, प्रीतम बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब रामनाथ आहेर (लोणी) हे 6 जण जखमी झाले. 

नागरिकांनी धाव घेत जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. महामार्ग पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे घटनास्थळी दाखल झाले. क्रेन बोलावून वाहने बाजूला घेत ठप्प झालेली वाहतूक त्यांनी सुरळीत केली.

Post a Comment

Previous Post Next Post