पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची श्री साई मंदिरास भेट

 
शिर्डी, (दि.03 डिसेंबर) : ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथील श्री साई मंदिरास भेट देऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.

 
याप्रसंगी  साई  संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र  ठाकरे,  उपविभागीय  अधिकारी  गोविंद  शिंदे,  राहात्याचे  तहसिलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे उपस्थित होते.

 
जगावर  आलेले  कोरोनाचे  संकट  समूळ  नष्ट  होऊन  सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी  प्रार्थना  श्री  साईबाबांच्या  चरणी  केल्याचे  त्यांनी यावेळी  बोलताना  सांगितले.  
 
 
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शासनाने  जारी  केलेल्या दिशा निर्देशांचे भाविकांनी काटेकोरपणे पालन  करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

Post a Comment

Previous Post Next Post