शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ आणि भिंगार अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीच्या समोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होते.
नवी दिल्ली येथे गेल्या सप्ताहापासून देशातील विविध भागातून आलेले शेतकरी आंदोलन करीत असून, केंद्र सरकारने हे नवे धोरण बदलत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा शेतकरी संघटनांचा प्रयत्न आहे. या त्यांच्या प्रयत्नाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ठिकठिकाणी आज आंदोलन करणार आहे. त्यात नगर शहर काँग्रेस श्री.भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करुन प्रदेश काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे.
या आंदोलनात श्रीमती शरदा वाघमारे, फिरोज शफी खान, शामराव वाघस्कर, मार्गारेट जाधव, अज्जूभाई शेख, विवेक येवले, हनिफ शेख, सुमन काळापहाड, रुपसिंग कदम, अनिल वराडे, राजेश बाठीया, अॅड..नरेंद्र भिंगारदिवे, आर.आर पाटील आदिंसह तालुक्यातील शेतकरी सहभागी झाला होते.
आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत नव्या कायद्याला विरोध केला. या आंदोलनामुळे देशातील शेतकर्यांमध्ये जागृती झाली असून, केंद्र सरकार हे शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याची टिका श्री.भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकर्यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून, काँग्रेसजण शेतकर्यांसाठी यापुढे तीव्र आंदोलन करेल, असा इशारा अॅड.पिल्ले व फिरोज खान यांनी धरणे आंदोलन प्रसंगी दिा. पदाधिकारी आणि तालुक्यातील शेतकर्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.