नगर, (दि.29 नोव्हेंबर) : बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तींनी आत प्रवेश करुन उचकापाचक करुन रोख रक्कमेसह सोन्या - चांदेचे दागिने, मोबाईल असा 2 लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.
ही घटना केडगाव येथे माधवनगर परिसरात शनिवारी रात्री 2 च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शोभा कोंडीराम आव्हाड (वय 43, वर्षे धंदा, रा.माधवनगर, लिंकरोड, गणपती कारखान्या शेजारी,केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास कोतवाली सपोनि रणदिवे करीत आहे.
शहरातील उपनगरात चोर्याचे प्रमाण वाढत चालले असून पोलिसांनी विविध भागात गस्त वाढवावी अशी मागणी वारंवार पोलिसांकडे करण्यात येत आहे.
