चेतन खेलियाचे यश अहमदनगर महाविद्यालयासाठी अभिमानास्पद : प्राचार्य आर.जे.बार्नबस


 
नगर, (दि.09 डिसेंबर) : अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थी चेतन विष्णू खेलिया याने एम.एम. बरोबरच नीट व जेआरएफ परिक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी हिंदी विभागप्रमुख रिचा शर्मा, डॉ.एन.आर.सोमवंशी, डॉ.ए.व्ही.नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ.बी.एम.गायकर, ए.वाय.बळीद आदि उपस्थित होते.


याप्रसंगी डॉ.आर.जे.बार्नबस म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व आधुनिक शिक्षणा देण्यावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर विविध भाषांचाही अभ्यास या ठिकाणी करुन घेतला जातो. कोरोना काळात शिक्षणात, परिक्षांमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, 

 

परंतु महाविद्यालयातील शिक्षकांच्या प्रयत्नांतून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळून विविध स्तरातून अभ्यास व मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांनीही जबाबदारीने यश प्राप्त केले आहे. चेतन खेलिया यांनी एम.ए.बरोबरच नीट व जेआरएफ परिक्षा उत्तीर्ण करुन एक आदर्श निर्माण केला आहे. याचा महाविद्यालयाला अभिमान आहे. महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत तत्पर व क्रियाशिल असल्याचे सांगितले.


याप्रसंगी  हिंदी विभागप्रमुख रिचा शर्मा यांनीही महाविद्यालयाच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन चेतन खेलिया यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post