ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे उपोषण सुरू



नगर,(दि.08 डिसेंबर) : दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले. दिल्लीमधील शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनास अण्णा हजारे यांनी पूर्वीच पाठिंबा दिला आहे.


हजारे म्हणाले, कृषीमूल्य आयोगाला सरकारनं स्वायत्तता द्यायला हवी, अशी मागणी आपली पूर्वीपासून आहे. स्वामिनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जादा भाव द्यायला पाहिजे. ही मागणी मोदी सरकारनं गेल्या वेळेस मान्य केली. 23 मार्च 2018 ला लिखित आश्‍वासन दिले. पण त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. 

 

मी सतत पत्रव्यवहार करत राहिलो, पण आश्‍वासन पाळण्यात आले नाही. त्यानंतर मी 7 दिवस उपोषण केले. कृषिमंत्र्यांनी तेव्हाही लिखित आश्‍वासन दिले की, कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्याविषयी समिती बनवण्यात येईल. 30 ऑक्टोबर 2019 ला समितीचा अहवाल येईल.


त्यानंतर कार्यवाही करू. पंतप्रधान आणि दोन कृषिमंत्र्यांनी लिखित आश्‍वासन दिल्यानंतरही स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला भाव आणि कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळाली नाही, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post