नगर, (दि.30 डिसेंबर) : येथील तारकपूर भागातील सिंधी कॉलनीत घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे 3 लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना सोमवारी घडली आहे.
याबाबत अशोक नंदलाल सुहेंदा (रा. तारकपूर, नगर) यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहेंदा हे सोमवारी दि.28 डिसेंबर रोजी सकाळी साडेआकरा ते सायंकाळी साडेसहा या वेळेत नातेवाईकांकडे निंबोडी येथे गेले होते. या वेळेतच चोरट्यांनी डाव साधला.
सुहेंदा हे नसल्याचे चोरट्यांनी पाहून चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. वस्तुची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने आणि रोख रककम असा एकूण 3 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे.