प्राध्यापकावरील चाकु हल्ल्यातील दोघे जेरबंद


। अहिल्यानगर । दि.11 मे 2025  । लुटमारीच्या उद्देशाने प्राध्यापकावर केलेल्या चाकु हल्ल्याच्या गुन्हयातील 2 आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहीद शेख, विजय ठोंबरे, रोहित येमुल, रोहित मिसाळ, मयुर गायकवाड, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड यांनी कारवाई केली.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 8 MAY 

निखील विकास बोरकर (वय 34,रा.पुसद,जि.यवतमाळ) हे कुटुंबियांना भेटण्यासाठी नगर येथे आले असताना दि.6 रोजी पहाटे 3.45 वा.श्‍वसनाचा त्रास झाल्याने ते घराबाहेर आले. रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पुलावरून जात असताना अज्ञात तीन आरोपी मोपेडवरून आले. त्यांनी बोरकर यांना आडवून खिसे तपासले. पैसे न मिळाल्याने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 1 MAY  

बोरकर यांनी प्रतिकार केल्याने आरोपींनी चाकुने त्यांचे हातावर, पाठीवर वार करून ते पळून गेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहिती व तांत्रीक विश्‍लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास केला. प्रविण चांदणे याने त्याच्या दोन साथीदारांसह गुन्हा केला असून आरोपी सिध्दार्थनगर येथे असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 24 APRIL

पथकातील पोलीस अंमलदारांनी सिध्दार्थनगर येथे जाऊन संशयीतांचा शोध घेऊन ते मोपेड गाडीवर असताना मिळून आले.  प्रविण राजु चांदणे (वय 19),  राहुल राजू भोसले (वय 20, दोन्ही रा. सिध्दार्थनगर) यांना ताब्यात घेतले. पळून गेलेल्या साथीदाराचे नाव  गणेश विजय लोमटे (रा.प्रेमदान हाडको) (पसार) असे असल्याचे सांगितले. गुन्हयात वापरलेली 90 हजार रूपये किंमतीची मोपेड जप्त करण्यात आली आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग 17 APRIL 

Post a Comment

Previous Post Next Post