भैरवनाथ देवस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

नगर, (दि.30 डिसेंबर) :आगडगाव येथील काळ भैरवनाथ देवस्थानच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच नेत्रतज्ज्ञ डॉ. रावसाहेब बोरुडे व डॉ. सारिका बोरुडे यांच्या हस्ते झाले. ही दिनदर्शिका भाविकांना मोफत वाटप करण्यात आली.

देवस्थानच्या वतीने दरवर्षी दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. गेल्या तेरा वर्षांपासून गावचे सुपूत्र डॉ. रावसाहेब बोरुडे यासाठी सहकार्य करतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक अडचणी असताना सुद्धा त्यांनी दिनदर्शिकेचे प्रकाशन करून देवस्थानला मदत केली.

रविवारी भैरवनाथ मंदिराजवळ दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉ.बोरुडे दाम्पत्यांच्या हस्ते झाले. दिनदर्शिकेवरर देवस्थानजवळ सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे.

या वेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे, देवस्थानचे अध्यक्ष बलभीम कराळे, सचिव त्र्यंबक साळुंके, दीपक गुगळे, मुरलीधर कराळे,  नितीन कराळे, संभाजी कराळे, दिलीप गायकवाड तसेच मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post