जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजले धर्मनाथ विद्यालय
श्री धर्मनाथ विद्यालयाची 2009 बॅचचे विद्यार्थी आले एकत्र
। अहिल्यानगर । दि.07 मे 2025 । तांदळी वडगाव (ता.अहिल्यानगर) येथील श्री धर्मनाथ विद्या प्रसारक मंडळाचे श्री धर्मनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा शनिवारी (दि.3 मे ) रोजी स्नेहमेळावा पार पडला. तब्बल 16 वर्षानंतर सर्वजण एकत्र आले होते.
शाळेतील मस्ती, एकत्रिपणे केलेला अभ्यास, शाळेतील शिक्षकांनी वेळोवेळी सांगितलेल्या मार्गदर्शनपर गोष्टी, अवघड विषयांची शिक्षकांनी लावलेली अभ्यासाची गोडी, स्नेसंमेलन त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम, विविध क्षेत्रात काम करताना घेतलेले प्रमाणिक कष्ट, सचोटी, प्रत्येकाच्या सुखदुःखात हळुवारपणे मिळालेली प्रेमाची साथ, अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी तत्कालीन शिक्षकांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना नोकरी, व्यवसाय, घरकाम करत असताना कुटुंबातील जेष्ठांनी मैत्रीपुर्ण संबंध ठेवावेत, कुठलेही काम मनापासून कारुन त्यात प्राविण्य मिळवा, समाजउपयोगी कार्य करावीत, आयुष्यभर विद्यार्थी बनून रहा, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रम सुफळ संपन्नतेसाठी सर्व माजी परिश्रम घेतले. उज्वल भविष्य घडविण्याचा या शाळेसाठी तसेच भविष्यात घडणारे विद्यार्थ्यांसाठी अधुनिकतीचे कास धरत आर्थिक मदत केली आहे.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष शरद घिगे, पदाधिकारी व ग्रामस्थ भिमसेन घिगे, दत्तात्रय दळवी, पोपट ठोंबरे, रमेश ठोंबरे, रघुनाथ ठोंबरे आदी सह मुख्यध्यापक बलभीम कराळे, बाळासाहेब पिंपळे, सुपेकर निकम, हसिना शेख, सरोज पवार आदीसह शिक्षक व ग्रामस्थ व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.