नगर, (दि.16 नोव्हेंबर) : खरीप हंगामातील हवामान आधारित पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी २२ लाख ८३ हजार ९३४ रुपयांचा पीकविमा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.
तालुक्यातील ६३१ शेतकऱ्यांना संत्रा पिकासाठी १ लाख ९९ हजार ४५, डाळिंबासाठी २ कोटी २० लाख ३ हजार ९४०, तर आंबा पिकासाठी ८० हजार ९४९ रूपयांचा विमा मंजूर झाला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचा प्रयत्न असून या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न असल्याचे लंके यांनी सांगितले.
दरम्यान, शेतकऱ्यांसह मतदारसंघातील सर्वच घटकांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता काही शंका असल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लंके यांनी केले.
