दिवाळीच्या दिवशी मित्रावरच गोळीबार करणार्‍यास 24 तासात गुन्हे शाखेने केले जेरबंद



नगर, (दि.16 नोव्हेंबर) : जामखेड तालुक्यातील जवळके येथे मित्रावरच गावठी कट्टयातून गोळीबार करणार्‍या आरोपीला अवघ्या 24 तासांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.


अब्दुल कमाल शेख (वय 30 वर्षे रा.जवळके ता.जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. दि.14 नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी 5.30 वा.च्या सुमारास जवळके गावचे शिवारात अब्दुल कमाल शेख,जखमी इसम बारीकराव शहाजी जावळे ( रा.जवळके)व इतर तीन ते चार जण बसलेले असतांना अब्दुल कमाल शेख याने विनापरवान्याचे गावठी बनावटीचे पिस्टल हाताळतांना त्याच्या पिस्टल मधुन फायर करुन जखमी बारीकराव शहाजी जावळे याच्या हाताला गोळी लागल्याने त्यास उपचारासाठी मॅक्स केअर हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले होते.


या घटनेबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी माहिती घेवुन यामधील फायर करणारा इसम अब्दुल कमाल शेख हा देखील अहमदनगर बाजुकडेच आलेला असल्याबाबत गोपनीय माहिती घेवुन स्थानीक गुन्हे शाखा अहमदनगर येथे कळविल्याने स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि शिशिरकुमार देशमुख व त्यांचे सोबत विशाल दळवी, सागर ससाणे,रोहीत येमुल,उमाकांत गावडे यांनी आरोपीस जेरबंद केले.


आरोपीच्या ताब्यातून (गावठी कट्टा) व दोन जिवंत काडतुसे असा एकुण 25,400/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post