प्रवासा दरम्यान थांबलेल्या इसमाला चोरट्यांनी घाताल गंडा


नगर, (दि.15 नोव्हेंबर) : कामगाव परिसरात एका नामांकीत  हॉटेल जवळ थांबलेल्या एकाला अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये 55 हजार रूपयांची रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.

माहिती अशी की, विनोद सुंदर चव्हाण (वय- 36 रा. घुमटवाडी ता. पाथर्डी) हे प्रवासा दरम्यान कामरगाव शिवारातील हॉटेल ग्रीन पार्क येथे थांबले होते. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्याकडील 55 हजाराची रोकड व त्यांचा मोबाईल चोरून पसार झाले आहे.

विनोद सुंदर चव्हाण (वय- 36 रा. घुमटवाडी ता. पाथर्डी) यांनी तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

जिल्हयात सध्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून, आता ग्रामिण भागामध्ये देखील चोरट्यांनी आपले बस्तान बसवल्याचे दिसत आहे. रहदारिच्या रस्त्यावर नागरीकांना अडवून लुटण्याच्या घटनेत वाढ होत आहे.

अशा घटनांना आळा बसवण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे. त्याच बरोबर नागरकांनी देखील प्रवास करताना अनोळखी व्यक्तीपासून सावध राहिले पाहिजे  तरच अशा घटनांना आळा बसेल.

Post a Comment

Previous Post Next Post