गुंडेगावमध्ये ऐतिहासिक वेशीवर दिवे लावून दिवाळी साजरी


नगर, (दि.15 नोव्हेंबर) : कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता गुंडेगाव ( ता.नगर) येथे फटाके न फोडता ऐतिहासिक वेशीवर दिवे लावून साध्या पध्दतीने दिवाळी साजरी करण्यात आली व निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाचेप्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांच्या आहवानाला प्रतिसाद देत प्रदुषण मुक्त दिवाळी युवकांनी साजरी केली आसून समाजामध्ये चांगला संदेश दिला आहे


दीपावली म्हणजे प्रकाश माला जीवनामध्ये अनेक दिशा, बाजू आणि पैलू येतात आणि जीवनाला पूर्ण रीतीने समजून घेण्यासाठी या सर्व घटकांवर प्रकाश पडणे महत्वाचे आहे. प्रकाशाच्या या माला आपणास स्मरण करतात कि जीवनातील हरएक पैलूवर लक्ष देणे आणि ज्ञानाचा प्रकाश टाकणे गरजेचे आहे आसे मत इतिहास प्रेमी दादा साहेब आगळे यांनी व्यक्त केले आहे


प्रत्येक मनुष्यामध्ये काही चांगले गुण आहेत आणि आपण प्रज्वलित केलेले दीपक याचेच प्रतिक आहेत. कोणामध्ये सहिष्णुता तर कोणामध्ये प्रेम, साहस, उदारता इत्यादी गुण आहेत. तर काही लोकांमध्ये या सर्व लोकांना एकत्र जोडून ठेवण्याचा गुण आहे. आपल्यातील हे सुप्त गुण दिपक प्रमाणे आहेत.


म्हणून एकच दिवा लाऊन संतुष्ट होऊ नका तर हजारो दिवे लावा. अज्ञानाचा अंधःकार दूर करण्यासाठी अनेक दिवे पेटवावे लागतील. ज्ञानाचा दिवा पेटवून आणि ज्ञान प्राप्त करून आपण आपल्यातील सुप्त गुणांना जागृत करू शकतो. जेंव्हा हे प्रकाशित आणि जागृत होतील तेंव्हाच खर्‍या अर्थाने ‘दिवाळी’ साजरी होईल पत्रकार  संजय भापकर यांनी सांगितले.


या सामाजिक दिपावलीच्या निमित्ताने दादासाहेब आगळे,माऊली कुताळ, दादासाहेब जावळे यांच्या माध्यमातून ऐतिहासिक वेशीवर दिवे लावून दिपावली साजरी करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post