यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे तसंच देशातील सर्व खासदार आणि राज्यातील सर्व आमदारांना साई ब्लेसिंग बॉक्स दिपावलीच्या शुभेच्छा म्हणून पाठवले आहेत.
साई मंदिर 17 मार्चपासून बंद असल्याने भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. असंख्य भाविक मंदिर खुले करण्याची वाट बघत आहेत. पण या जीवघेण्या कोरोना संकटात साईबाबांचे आशिर्वाद मिळावेत या संकल्पनेतून शिर्डीचे प्रसिद्ध चित्रकार हेमंत यांनी ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून घरपोच साई ब्लेसिंग बॉक्सची संकल्पना राबवली आहे.
या साई ब्लेसिंग बॉक्समध्ये साई समाधीवरील फुलांपासून बनवेलेली अगरबत्ती, झेंडू फुलांपासून बनवलेला अष्टगंध, चित्रकार हेमंत वाणी यांनी रेखाटलेले साई कृपा दृष्टी चित्र, साई नामस्मरण सीडी, अगरबत्ती स्टँन्ड, गायीच्या गौरीपासून बनवलेले धुप, अगरबत्ती स्टँण्ड, मेणबत्ती, दिवा अशा नऊ वस्तूंचा समावेश आहे. हा बॉक्स 1500 रुपयांना देण्यात येणार असून ज्या भाविकांसाठी तो पाठवण्यात येणार आहे त्यांच्या नावाने साई संस्थानच्या अन्नदानासाठी 51 रुपयांची देणगी पावती सदर बॉक्समध्ये असणार आहे.
