मुंबई, (दि.01 नोव्हेंबर ) : अंधश्रद्धाविरोधी चळवळीतील कार्यकर्ते, विज्ञानवादी विचारवंत, दिवंगत डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे.
पुरोगामी, प्रगतशील, विज्ञानवादी महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी त्यांनी दिलेले योगदान, समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धाविरोधात त्यांनी दिलेला लढा पुढं घेऊन जाणं, हीच या महान विचारवंताला, सामाजिक कार्यकर्त्याला खरी श्रद्धांजली ठरेल,
डॉ.नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी म्हटले आहे.
Tags:
Maharashtra
