शेवगाव, (दि.24 नोव्हेंबर) : नागलवाडीचे सुपुत्र संजय आंधळे उर्फ कवी सुभद्रासुत यांच्या नुकत्याच अ.नगर केडगाव येथे प्रकाशित झालेल्या सामाजिक ग्रामीण व शहरी विविध विषयावरील दिनविशेष असणार्या ‘झरा जाणिवांचा’या ह्रदयद्रावक काव्य संग्रहाचे ह.भ.प.गिते महाराज भगवानगड, ज्येष्ठ वाचक बाबुराव पं.ढाकणे, उपसरपंच संजय आंधळे, बाबासाहेब नागरे महाराज, पै.जाधव यांच्या उपस्थितीत कवी सुभद्रासुत आंधळे व कवी लक्ष्मण खेडकर यांच्या शब्दातून अनेक कवितांचे विवेचन गावच्या पारावर करण्यात आले.
हा काव्यसंग्रह गावकर्यांसमोर प्रत्यक्षात उलगडूनच दाखवला. यावेळी मान्यवर व तरुणांनी पुस्तकांबद्दल मनोगत व्यक्त केले. पुस्तकांच्या प्रती गावातील 3 अंगणवाडी, 1आशासेविका, 3 तरुण मित्र मंडळे, ग्रामपंचायत, जि.प. प्रा.शाळा यांना भेट देण्यात आल्या.
यावेळी गावातील बहुतांश बाल,तरुण ,जेष्ठनागरिक ,महीला मंडळ सर्वच उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंबादास ढाकणे व आभार रामेश्वेर ढाकणे यांनी मानले.
Tags:
Ahmednagar