हॉटेल व्यवस्थापकाला लावला चुना




नगर ,दि.10 (प्रतिनिधी) : सक्करचौक जवळील एका आलिशान हॉटेलमध्ये पुण्याती चौघानी आरम करुन हॉटेल व्यवस्थापकाची ऑनलाईन फसवणुक करुन पोबारा केला आहे.


माहिती अशी की, सक्करचौक जवळील एका नामांकीत हॉटेल लॉर्जिंगचे बिल देण्यासाठी चौघा आरोपींनी जातांना हॉटेलच्या काउंटरवर ऑनलाईन पैसे अकाऊंटवर पाठविल्याचे भासवून ऑनलाईन फसवणूक करून लॉर्जिंग हॉटेलचे पैसे न देताच पसार झाले आहे. 

 

या प्रकरणाबाबत हॉटेल व्यवस्थापकाने कोतवाली पोलिसात ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीनुसार चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना पटारे हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post