कत्तलीसाठी जाणार्‍या 5 जनावरांची सुटका


नगर, (दि.11 नोव्हेंबर) : कत्तलीसाठी पीकअपमधून नेण्यात येणार्‍या 3 गायी व 2 वासरांची सुटका आश्वी पोलिसांनी केली. ही कारवाई शनिवारी रात्री 8.30 वाजता निमगावजाळीतील हॉटेल गोविंद गार्डन परिसरात झाली. वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


कोल्हार-घोटी महामार्गावरुन चाललेल्या पीकअपमध्ये (एमएच 12 डीजी 863) कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्यांनी वाहन अडवले. तपासणी केली असता तीन गायी व दोन वासरे आढळली. कॉन्स्टेबल नीलेश दादासाहेब वर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक गुफरान नसीर कुरेशी (संगमनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post