नगर, (दि.02 नोव्हेंबर) : येथील नगर-सोलापूर महामार्गावरील बाभूळगाव शिवारात माहिजळगावहून मिरजगावकडे येणार्या सराफाच्या मोटारीस आडवून, पिस्तूल अन् सत्तूरचा धाक दाखवून लाकडी दांडक्याने मारहाण करुन दोन सराफांजवळील 60 लाखांचे सोन्या - चांदीचे दागिने चोरल्याची लंपास केले आहे. ही घटना रविवारी (दि. 1) सायंकाळी घडली.
मिरजगाव येथील सराफ अतुल चंद्रकांत पंडित यांचे माहिजळगाव येथे दुकान आहे. रविवारी पंडित व त्यांचे बंधू राहुल हे दोघे मोटारीने दुकानातील दागिने घेवून सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोटारीने निघाले. माहिजळगाव ते मिरजगाव दरम्यानच्या कवठीच्या लवणामध्ये त्यांची मोटार आली असता सहा चोरट्यांनी दोन दुचाक्या आडव्या लावून मोटार अडवून सराफांना लुटले.
सराफांच्या मोटारीच्या लाकडी दांडक्याने काचा फोडून या दोघा भावांच्या डोक्याला पिस्तूल, धारदार सत्तूर लावून मारहाण केली. तसेच त्यांच्याकडील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पिशवी घेवून चोरट्यांनी पोबारा केला. घटनेनंतर पंडित बंधूंनी नातेवाईक, मित्र यांना घटनेची माहिती दिली. रात्री उशिरापर्यंत नातेवाईक, मित्र चोरट्यांचा शोध घेत होते.
