नगर, (दि.13 नोव्हेंबर) : वाशिम ते पुणे खासगी बसने प्रवास करणार्या प्रवाशाची बॅग आतील सोन्याचे दागीने व रोख रकमेसह अज्ञात चोरांनी चोरुन नेली. ही घटना शुक्रवार (दि.30) साडेआठ वाजता ते शनिवार, दि.31 सकाळी 10.45 वाजल्याच्या दरम्यान घडल्याचे कोठला येथे निदर्शनास आली.
या बाबतची अधिक माहिती अशी की, विलास मधुकर जगताप (वय 64, रा.प्रतिकनगर, उत्तम टाऊन्स स्केप, पुणे) हे त्यांच्या पत्नीसह कारंजा लाड ते पुणे असे खासगी बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरांनी जगताप यांनी त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेले 8 हजार 700 रोख रक्कम, 1 लाख 35 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र आणि एटीएम कार्ड बॅगसह चोरुन नेले.
चोरट्याने एटीएम कार्डच्या साहाय्याने एटीएम मधून 21 हजार 500 रुपये चोरुन नेले. अशी एकूण 1 लाख 65 हजार 200 रुपयांची चोरी केली. या प्रकरणी विलास जगताप यांच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिसांनी भा.दं. वि.क. 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नेांद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत.
Tags:
Maharashtra
