वारुळाचा मारुती रोडवर घरफोडी : सोन्या चांदीचे दागीने चोरट्यांनी पळवले


नगर, (दि.22 नोव्हेंबर) :  नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती भागात अशोक लांडे यांच्या घरी चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करुन सोन्या चांदीचे दागीने पळवले आहे.


माहिती अशी की, अशोक बापु लांडे (वय 32, धंदा मजुरी, रा. वारुळाचा मारुती रोड, ललांडे मळा, नालेगाव,नगर) हे घराबाहेर बाजेवर झोपलेले असताना कोणीतरी अनोळखी व्यक्तीने त्यांचे घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.


घरामध्ये प्रवेश करुन उचकापाचक केली. लांडे यांना कशाचातरी आवाज आल्याने त्यांनी झोपेमधुन उठून पाहिले असता, कोणीतरी अनोळखी व्यक्ती पळून जाताना त्यांना दिसली. लांडे यांच्या घरामधुन चोरट्यांनी सोन्या चांदीचे सुमारे 23 हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले आहेत.


अशोक लांडे यांच्या माहितीवरुन तोफखाना पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास तोफखान्याचे पोलिस हवालदार गाजरे हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post