नगर, (दि.22 नोव्हेंबर) : शहरासह जिल्हयात चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून आता चोरट्यांनी शेतकर्यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. अशीच एक घटना पाथर्डीत घडली असून चोरट्याने गावरान म्हैसच चोरुन नेली आहे.
माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यात भालगाव येथे राहणारे सोमनाथ राधाकिसन लांडगे यांच्या घराजवळ बांधलेली गावरान जातीची म्हैस सुमारे 25 हजार रुपये किंमतीचे चोरट्यानी चोरुन नेली आहे. सोमनाथ लांडगे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. पुढील तपास पोहवा बाबर हे करीत आहे.
