नगर, (दि.07 नोव्हेंबर) : रस्ता विचारण्याचा बहाणा करून मोटारसायकलवरील दोघांनी व्यापार्यांची 2 लाख 70 हजाराची रक्कम लांबविली. ही घटना माळीवाडा येथे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.
प्रसन्नकुमार नेनसुखलाल नहार (वय 65, रा. कोहीनूर गार्डन, माळीवाडा) असे या व्यापार्याचे नाव असून या प्रकरणी त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोटारसायकलवरून दोन अनोळखी इसम आले.
त्यांनी नहार यांना हमे कृष्णा अपार्टमेेंट को जाना है, रस्ता बोलो असे हिंदीत विचारले. त्याचवेळी त्यांनी नहार यांच्या हातातील 2 लाख 70 हजाराची रक्कम असलेली बॅग हिसकावून चोरून नेली. या घटनेचा पुढील तपास सपोनि भंगाळे करीत आहेत.
