नगर, (दि.21 नोव्हेंबर) : मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटातून दागिने व रोख र क्कम असा सुमारे 59 हजाराचा ऐवज लांबविला. बोल्हेगाव येथील भारस्करनगर येथे दि. 19 रोजी रात्री 8 ते 21 रोजी पहाटे 4 च्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत दत्तात्रय नामदेव एकशिंगे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी कपाटातून 42 हजाराचे सोन्याचे दागिने व रोख र क्कम 9 हजार तसेच शेजारी राहणार्यांच्या घरातून रोख 7 हजार चोरुन नेले. तसेच देलमाडे यांच्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, असे एकशिंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दत्तात्रय एकशिंगे यांच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. पुढील तपास तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिस नाईक वाघमारे करीत आहेत.
