नगर, (दि.24 नोव्हेंबर) : रुईछत्तशी येथील शिवशांती कलेक्शनच्या दुकानात चोरट्यांनी पत्रे उचकटुन सुमारे 2 लाख 36 हजार 750 रुपयांचा माल चोरुन नेला आहे.
माहिती अशी की, रुईछत्तशी येथील बिभिशन शंकर सुरवडे (वय 40,धंदा - दुकाण, रा.खुंटेफळ, वाटेफळ) यांचे शिवशांती कलेक्शन नावाने कापडाचे दुकान आहे.
या दुकानाच्या छपराचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.दुकानातील मालाची उचका पाचु करुन दुकानामधील जिन्स, साड्या, टॉप, बनियन, टि शर्ट, नाईट पॅन्ट, लोईर, टॉवेल, रुमाल आदी वस्तु चोरुन नेल्य आहे. बाजारातील या वस्तुची किंमत सुमारे 2 लाख 63 हजार 755 रुपये इतकी आहे.
विभिशन शंकर सुरवडे यांच्या फिर्यादीवरुन नगर तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई राऊत करत आहेत.
