मनपा पतसंस्थेच्या सभासदांची कुठलीही फसवणूक नाही


नगर, (दि.02 नोव्हेंबर ) : महापालिका कर्मचारी पतसंस्थेने सभासदांना वस्तूरुपी कर्जवाटप केले असता आमच्या सभासदांची यामध्ये कुठलीही फसवणूक  झाली नसून हे वस्तुरुपी कर्ज नियमानुसार आम्ही संस्थेकडून घेतलेले आहे. मनपा कर्मचारी पतसंस्था ही आमच्या सभासदांची कामधेनू आहे. 

 

आम्ही आमच्या अडचणीच्या काळामध्ये मुला - मुलींचे लग्न, आजारपण तसेच शिक्षणासाठी लागणारा खर्च कर्जरुपी पतसंस्थेकडून घेऊन आमच आर्थिक उन्नती झालेली आहे. आमच्याकडे येऊन चुकीची माहिती सांगून आमच्या कोऱ्या कागदावर सह्या घेऊन दिशाभूल करण्याचे काम झाले आहे. 

 

तरी आमची पतसंस्थेच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही, अशी माहिती संस्थेच्या सभासदांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सभासद मच्छिंद्र साबळे, साहेबराव बोरगे, संजय बोरगे, विजेंद्र घोरपडे, ज्ञानेश्वर मगर, देवीदास जाधव, संजय कांबळे, शाम घोरपडे, विजय ठोकळे, विनय चव्हाण यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post