नगर, (दि.12 नोव्हेंबर) : ब्रिटीश काळात भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना इंग्रज अधिकार्यांकडून मजुरांवर होणार्या अन्यायाविरोधात बंड करणार्या पार्वताबाई महादू नवले (वय 105) यांचे निधन झाले. शिक्षक सोमनाथ नवले यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्यामागे 5 मुले तसेच नातवंडे, पणती असा परिवार आहे.
लहानपणापासून कंद, मुळे, झाडपाला याचे औषध गोळा करून परिसरातील रुग्णांना त्या बर्या करत. त्यांचे लग्न झाल्यानंतर त्या गूहिरे येथे आल्या. त्यावेळी भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना त्यांनी धरणाच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज अधिकार्यांनी त्यांच्याशी बंड करुन मजुरांची संघटना उभी करुन बंडाचे निशान त्यांनी उभे केले होते.
बंडखोर कोंड्या नवले यांच्या ब्रिटिशांविरोधातील बंडाला ताकद देण्याचे व त्याला भाकरी देण्याचे काम त्यांनी केले आहे. स्वातंत्र्य सैनिकांना भाकरी देऊन त्यांना त्या मदत करत होत्या. आपलं शिक्षण नसले तरी मुलांना शिक्षण दिले आहे. पुरुषाला लाजवील असे त्यांचे काम होते. 100 किलोचे पोते ते डोक्यावर, पाठीवर घेऊन 10 किलोमीटर पायी घेऊन जात असे.
आदिवासी भागातील ही गृहिणी अशिक्षित असली तरी जिद्दी होती. नातवंडांदेखील अधिकारी बनवले. काबाडकष्ट करून त्यांनी आपले कुटुंब सावरले. रानात जनावर चरण्यासाठी गेल्या असता वाघाशी झुंज देऊन त्यांनी वाघाच्या तावडीतून गाय सोडवली होती असे अनेक घटनांना नागरीकांनी उजाळा दिला आहे.
