नगर, (दि.04 ऑक्टोबर) : सालाबादप्रमाणे तुळजाभवानी देवीची पालखी राहुरी येथून प्रस्थान होऊन पारनेर, नगर तालुका, नगर शहर व नवरात्रीच्या तिसऱ्या माळीला बुऱहाणनगरवरुन भिंगार, तुळजापूर अशी मार्गस्थ होत असते.
परंतु देशावर आलेल्या संकटामुळे सालाबादप्रमाणे असलेले मार्ग बदलून राहुरीवरुन बुऱ्हाणनगर जगदंबा देवी मंदिर येथे पालखी आली असताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानासमोर पालखीचे विधीवत पुजा व आरती करण्यात आली.
यावेळी त्यांनी तुळजाभवानी मातेकडे कोरानाचे संकट लवकरात लवकर दूर होऊन विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करावी, अशी प्रार्थना केली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, अलकाताई कर्डिले, अक्षय कर्डिले, संदीप कर्डिले, पारनेरचे नगराध्यक्ष शंकर नगरे आदींसह
नागरदेवळेचे सरपंच राम पानमळकर, उद्योजक सुखदेव पवार, देवीच्या पालखीचे भक्त सुदाम भगत, ज्ञानेश्वर भगत, देवीदास भगत, सागर भगत संतोष भगत, वसंत भगत, सुरेंद्र भगत, दीपक भगत, खंडू भगत, मंगेश भगत, अमोल धाडगे, सोमनाथ वामन व इंजि. साळुंके उपस्थित होते.
