प्राध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या


नगर, (दि.04 ऑक्टोबर) :  कोल्हार येथील प्रा. सोमनाथ शांताराम निबे (53) यांनी शेतातील विहिरीत आत्महत्या केली. ही दुर्घटना शनिवारी पहाटे समजली. लोणी येथील पीव्हीपी सिनियर कॉलेजचे प्राध्यापक व कोल्हार येथील रहिवासी असलेले निबे यांचा मृतदेह विहिरीत आढळला.


तिथे मोटारसायकल लावलेली होती. लोणीचे पीएसआय नानासाहेब सूर्यवंशी व कोल्हारचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाजवळ चिट्ठी मिळाल्याने ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.


मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. त्यांच्या मागे पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस नाईक संभाजी कुसळकर करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post