बोल्हेगावात तात्पुरत्या पोलिस चौकीला मान्यता : नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांचा पुढाकार


नगर,दि.23 (प्रतिनिधी) : बोल्हेगाव - नागापूर परिसरात लोकवस्ती वाढली आहे. दरोडे व भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


त्यामुळे  नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी शहर पोलिस उपधिक्षक विशाल ढुमे व तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक हारुन मुलानी यांच्याकडे पोलिस चौकी उभारण्याची मागणी केली. त्याची दखल घेत पोलिस प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात पोलिस चौकीला मान्यता देण्यात आली असल्याचे वाकळे यांनी सांगितले.


पोलिस चौकीसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी वाकळे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. नगरसेवक वाकळे म्हणाले की, दिवाळीचा सण जवळ आला असून पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी  पोलिसांनी  गस्त  वाढवणे  आवश्यक  आहे.


गुन्हेगारी  पार्श्‍वभूमी  असणार्‍या  लोकांवर  कडक कारवाई  करावी,  टुकार  मुलांकडून महिलांची छेडछाड होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या संदर्भात उपाययोजना कराव्या अशी मागणी केली आहे.


यावेळी नगरसेवक डॉ.सागर बोरुडे, नगरसेवक राजेंद्र कातोरे, रमेश वाकळे, संपत वाटमोडे, संपत वाकळे, सुरज कोलते, सारंग कराळे, सनी वाकळे, आकाश वायकर, दशरत वाकळे, गौतम कापडे, सावळाराम कापडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post