नगर, (दि.23 ऑक्टोबर) : आज कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे, अशा परिस्थिती इतर आजारांबाबतही जागरुक राहणे आवश्यक आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे रक्तदानाचे प्रमाण घटले आहे, त्यामुळे गरजू रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गरज ओळखून रक्तदान शिबीराच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.
यापुढेही सामाजिक दायित्व जपून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आपण केलेल्या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यासाठी रक्तदान आवश्यक आहे. सध्या रक्तदान करतांनाही काळजी घेतली जात असल्याने कोरोनाची भिती न बाळगता सर्वांनी रक्तदान करावे, असे आवाहन माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केले.
नगर शहर शिवसेना, नक्षत्र प्राणायम ग्रुप, मोरया ग्रुप, फुलसौंदर मळा, संकल्प ग्रुप, साई सिंडीकेट ग्रुप यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, बाबूशेठ टायरवाले, शहरप्रमुख दिलीप सातपुते, भाजप शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, विक्रम राठोड, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे, सदा देवगांवकर, सुधीर पगारिया, विष्णू फुलसौंदर, अनिल शिंदे, संजय शेंडगे, संभाजी कदम, शरद झोडगे, संदेश कार्ले, प्रा.माणिकराव विधाते, अमित खामकर आदि उपस्थित होते.
यावेळी भगवान फुलसौंदर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक सचिन शिंदे, गणेश कवडे, अमोल येवले, दत्ता जाधव, शाम नळकांडे, दत्ता कावरे, परेश लोखंडे, संजय चोपडा, संतोष म्हस्के, विशाल वालकर, संग्राम कोतकर, अनिल लोखंडे, प्रा.संजय गारुडकर, डॉ.सुदर्शन गोरे, अशोक तुपे, निखिल शेलार, महेश शिंदे, संदिप दातरंगे, ऋषीकेश चाफे, राजु भगत, विजय पठारे, रमेश परतानी, हर्षल म्हस्के, सुनिल राऊत, डॉ.अभय मुथा, सुरेश तिवारी, गोरख पडोळे, राजेंद्र गांधी, पारुनाथ ढोकळे, अंबादास शिंदे, पोपट लोढा, रघुनाथ केदार, राजेंद्र फुलसौंदर, संजय आव्हाड, जालिंदर बोरुडे, आदि उपस्थित होते.
रक्त संकलनाचे कार्य अष्टविनायक ब्लड बँकेच्यावतीने करण्यात आले. यासाठी जितेंद्र पलिकुंडवार व टीमचे सहकार्य लाभले. या शिबीरात एकूण 57 रक्तपिशव्यांचे संकलन झाले. शेवटी सर्वांचे अवधूत फुलसौंदर यांनी आभार मानले.
