नगर, (दि.23 ऑक्टोबर) : अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी अरुण जोर्वेकर यांची निवड झाली. पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत चेअरमनपदासाठी अरुण जोर्वेकर यांच्या नावाची सुचना संचालक विलास वाघ यांनी मांडली.
सदर सुचनेस अनुमोदन संचालक वालचंद ढवळे यांनी दिले. त्यानुसार जोर्वेकर यांची चेअरमनपदी निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेवेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ सहाय्यक व्हि.के.मुटकुळे, संस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र पवार व उपव्यवस्थापक प्रशांत लोखंडे यांनी सहकार्य केले.
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर म्हणाले की, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने चांगल्या कामकाजातून वेगळेपण सिध्द केले आहे. सभासद हित लक्षात ठेवून तसेच शासकीय नियमानुसार संस्थेचा कारभार चालू आहे हे पाहून आनंद होतो. संस्था उत्तरोत्तर प्रगती साधेल असा विश्वास वाटतो.
या निवडीनंतर बोलताना चेअरमन अरूण जोर्वेकर म्हणाले की, श्री गणेश पॅनलनं निवडणुकीत दिलेली जवळपास सर्व आश्वासने पूर्ण करून सभासद हिताचा कारभार केला आहे. संस्था कॅश क्रेडिट मुक्त केली आहे. सभासदांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यात आमच्या पॅनलला यश आले आहे.
सदर प्रसंगी संस्थेचे व्हा.चेअरमन प्रताप गांगर्डे, संचालक संजय कडुस, सुभाष कराळे, भरत घुगे, सोपान हरदास , संतोष नलगे, संजु चौधरी, अरुण शिरसाठ, ज्ञानदेव जवणे, हरी शेळके, मोहन जायभाये, नारायण बोराडे, इंदु गोडसे, उषा देशमुख, शशिकांत रासकर, अशोक काळापहाड,विलास शेळके,कैलास डावरे कर्मचारी वृंद उपस्थित होते.
