मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले मंदिराच्या बाहेरूनच श्री तुळजाभवानीचे दर्शन

 


तुळजापूर, (दि.21 ऑक्टोबर) :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पीक नुकसानीच्या पाहणीसाठी व शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरुनच श्री तुळजाभवानी मातेचे त्यांनी दर्शन घेतले व श्री तुळजाभवानी मातेला शेतकरी बांधवावर आलेले संकट दूर करण्याचे साकडे त्यांनी घातले.

 

यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, मिलिंद नार्वेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

Post a Comment

Previous Post Next Post