जुगार अड्यावर अवैध धंद्यावर पोलिसांचा छापा


नगर, (दि.21 ऑक्टोबर) : बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर प्रभारी पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या पथकाने छापा टाकून 6 हजार 820 रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जपत केला आहे.


या कारवाईत 6 जणांविरुध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हयाची नोंद केली आहे. ही कारवाई कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत केली.


तसेच बेलवंडी येथे वाळुची अवैध वाहतूक करणारे शिरुर ते बेलवंडी जाणार्‍या रोडवर पथकाने पकडले. वाळू वाहतूक करणार्‍या ट्रक (क्र.एम.एच.12 एच.डी.2805) व ढंपर ट्रक (क्र.एम.एच.16 सी.सी.2729) व 8 ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त केला आहे.


या कारवाईत दीपक नामदेव केंदळे (वय 25, रा.दुर्गाव, ता.कर्जत), भाऊसाहेब गणपत ढवळे, (वय 46,रा.देवदैठण, ता.श्रीगोंदा) यांना अटक केली आहे.


ही कारवाई हेड कॉस्टेबल गणेश डहाळे, भरत डंगोरे, पो.ना.घुले, धामणे व पो.कॉ.गायकवाड यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post