नगर, (दि.21 ऑक्टोबर) : गुंडेगाव ता.नगर येथे वृक्षप्रेमी कै.रविंद्र देशमुख यांच्या स्मरणार्थ सिंहगड कॉलेज कृती समिती चे अध्यक्ष राजेंद्र देशमुख व देशमुख कुटुंबाने औचित्य साधून, निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाच्या सहकार्याने खंडोबा डोंगर परीसरात गोसावी टेकडी येथे नुकतीच सुमारे १५० रोपांची लागवड करण्यात आली.
विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी यांनी ही रोपे दत्तक घेतली असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून रोपांचे संगोपन करण्याचे ठरविले आहे . भविष्यात गुंडेगाव पर्यटन स्थळ विकसीत होण्यासाठी मदत होईल असे मत व्यक्त केले .
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सिंहगड कॉलेज कृती समिती चे अध्यक्ष राजेंद्र देशमुख, माऊली कुताळ, श्रावणी देशमुख यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक भापकर गुरूजी , निसर्ग व सामाजिक प्रदुषण निवारण मंडळाचे राज्य कार्यकारिणी प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर उपस्थित होते,
भविष्यात वृक्षारोपण काळाची गरज आसून " ऑक्सिजन हब " बनविण्याचे काम कुटुंबाने केले पाहिजे आसे मत प्रसिद्धी प्रमुख संजय भापकर यांनी व्यक्त केले.
