नगर शहरात गोमांस साठा जप्त : दोघे पोलिसांच्या ताब्यात

 

नगर, (दि.19 ऑक्टोबर) : शहरातील झेंडीगेट परिसरात प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाकडून गोमास विक्रीच्या ठिकाणी छापा मारुन या ठिकाणावरुन दोघांना ताब्यात घेतले आहे.  यातील आरोपींकडून साधनांचा 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


ताब्यात घेतलेल्यामध्ये नावेद सादिक कुरेशी, मोसिन सादिक कुरेशी अशी त्यांची नावे आहेत.


मिळालेली माहिती अशी की, येथील कोतवाली स्टेशनच्या  हद्दीमध्ये झेंडीगेट परिसरामध्ये गोहत्या करून गोमास विक्री होत असल्याची गोपनीय माहिती प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.राठोड यांना मिळाली.


डॉ.राठोड यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्या विशेष पोलीस पथकाने झेंडीगेट परिसरातील गोमांस विक्री ठिकाणी छापे टाकले. यावेळी दोघांना ताब्यात घेऊन 280 किलो गोमांस व अन्य साहित्य असा 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


पकडलेल्या आरोपींवर कोतवाली पोलिस ठाण्यात भादविक 269 व व महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (क),9(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि पवार, विशेष पोलिस पथकातील पोहेकॉ गणेश डहाळे, भरत डंगोरे, पोना घुले, धामणे, पोकॉ गायकवाड आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post