नगर जिल्ह्यातील जनतेसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचे संपर्क कार्यलय सुरु : भाऊ कोरगावकर

नगर, (दि.19 ऑक्टोबर) : नगर जिल्ह्यातील सर्वसामन्य जनतेचे प्रश्न , समस्या सोडवण्यासाठी या सपंर्क कार्यलयाचा उपयोग होईल तसेच प्रत्येक शिवसेनेचा कार्यकर्त्याला आपल्या हक्काचे असे कार्यलय उपलब्ध होऊ शकेल त्यामधमातून नागरिकांचे प्रश्न, अडीअडचणी सोडवल्या जातील असे प्रतिपादन शिवसेनेचे सम्पर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी व्यक्त केले


बुरडगाव रोडवरील शासकीय पॉलिटकनिकच्या जागेमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचे संपर्ककार्यालयाचे  उद्घाटन  शिवसेनेचे सम्पर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी  जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, उतार जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसुंदर, 

 

संघटक स्मिता अष्टेकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी शहरप्रमुख  संभाजी कदम, संजय शेडगे, अभिषेक कळमकर, संदेश कार्ले, शरद झोडगे, शाम नळकांडे, मदन आढाव, योगीराज गाडे, अनिल बोरुडे, अमोल येवले, रमेश परतानी, अंबादास शिंदे, विशाल वालकर, निलेश भाकरे, आनंद लहामगे, गिरीश जाधव, संग्राम कोतकर, मेहुल भंडारी, सुनील त्रिपाठी, संतोष गेनप्पा आदी उपिस्थत होते


यावेळी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले कि,  सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्याचे काम या कार्यलयाच्या माध्यमातून होणार आहे .खासदार या नात्याने जिल्हयातील विविध प्रश्नाबाबत चर्चा विचार विनिमय, भेटी गाठी या कार्यलयाच्या माध्यमातून करता येईल सामान्य जनतेला मला भेटून त्याच्या समस्या सांगता येतील व त्या समस्या सोडवण्यात येतील असे खासदार लोखंडे यांनी सांगितले.


यावेळी जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे ,व विक्रम राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी केले यावेळी सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला .

Post a Comment

Previous Post Next Post