धुम स्टाईलने गंठन पळवले


नगर, (दि.19 ऑक्टोबर) : गायकवाड मळा चिंतामनी हॉस्पिटल परिसराच्या जवळ राहणार्‍या आशा शिर्के ह्या घरी जात असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन चोरुन चोरट्यांनी पोबारा केला.


मिळालेली माहिती अशी की, आशा राम शिर्के (वय 42, रा.चिंतामणी हॉस्पिटल मागे, गायकवाड मळा, जैन स्थानक मंदिर जवळ, बालिकाश्रम) ह्या दि.17 रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी राहणार्‍या आलका ढुमणे यांच्या समवेत रस्त्याने घरी जात होत्या.


त्यावेळी चोरटा मोटारसायकलवर जोरात येवून त्याने शिर्के यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हे ओढुन तोडुन बळजबरीने चोरुन नेले आहे.


दि.17 रोजी शिर्के या गोंधळेल्या असल्याने त्यांनी दि.18 रोजी तोफखाना पोलिसात फिर्याद दिली असून त्यांनी म्हंटले आहे की, 37 हजार 500 रुपये किंमतीचे दिड तोळे वजनाची सोन्याचे 

 

मिनी गंठन त्यामध्ये काळ्या रंगाचे मनी असलेले सुमारे 25 हजार रुपयांचे गंठन चोरट्यांनी बळजबरीने चोरुन नेले आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनी मुंडे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post